हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रत्येक मुलीचे किंवा मुलाचे स्वप्न असते की, आपला विवाह सोहळा शाही (Shahi Wedding Plans( पद्धतीने पार पडावा. परंतु या विवाह सोहळ्यासाठी लागणारा खर्च प्रत्येकालाच परवडत नाही. त्यामुळे अनेकांचे हे स्वप्न अधोरेच राहते. परंतु कोणताही विवाह सोहळा धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी त्यासाठी लागते ते परफेक्ट बजेट फ्रेंडली नियोजन तुम्ही जर हे नियोजन व्यवस्थित केले तर तुमचा देखील विवाह सोहळा शाही पद्धतीने पार पडू शकतो. यासाठी कोणत्या गोष्टी करायची आवश्यकता आहे जाणून घेऊया.
पैशांचे व्यवस्थित नियोजन करा – तुम्हाला जर कमी पैशांमध्ये चांगला विवाह सोहळा संपन्न करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याकडे असणाऱ्या पैशांची इन्व्हेस्टमेंट कोणकोणत्या गोष्टींमध्ये करायचे आहे? याचे प्रॉपर प्लॅनिंग करा. लग्नाच्या अगोदरच तुम्ही तुमचे पैसे कपड्यांसाठी,, समारंभासाठी,, दागिन्यांसाठी, जेवणासाठी किती घालवणार आहात याचे बजेट तयार करा.
निसर्गरम्य डेस्टिनेशन ठरवा – बऱ्याच वेळा अनेक लोक एखादा वाडा किंवा पॅलेस लग्नासाठी बुक करतात. यामुळे या पॅलेसला सजवण्यासाठीच जास्त खर्च द्यावा लागतो. परंतु तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी विवाह सोहळा आयोजित करत असाल तर तुम्हाला जास्त डेकोरेशनची गरज लागणार नाही. तुम्ही जी जागा निवडली आहे त्याच जागेमुळे तुमच्या लग्नाची शोभा आणखीन वाढेल. आणि तुम्हाला वेगळ्या डेकोरेशनसाठी पैसे खर्च करावे लागणार नाही.
होलसेल दरात खरेदी करा – सध्या बाजारामध्ये अशी अनेक दुकाने उभी झाली आहेत, जेथे कोणतीही वस्तू होलसेल दरामध्ये मिळते. त्यामुळे तुम्ही कधीही एखाद्या मॉलमधून लग्नाची खरेदी करू नका. तसेच डेकोरेशनसाठी जे सामान हवे आहे किंवा जी ज्वेलरी लागत आहे, त्यासाठी एखादे ओळखीमधील होलसेलचे दुकान निवडा आणि तेथूनच लग्नाची सर्व खरेदी करा.
जेवण चांगले ठेवा – कोणत्याही लग्नाची आठवण त्या लग्नामध्ये ठेवण्यात आलेल्या जेवणावरून करण्यात येते. तुमचे जेवण चांगले नसेल तर तुम्ही किती शाही विवाह सोहळा केला तरी लोकं त्याला नावेच ठेवतील. त्यामुळेच इतर गोष्टींवर जास्त खर्च करण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे जेवण ठेवा. यामुळे तुमचे नातलग, मित्र, बॉस खुश होतील.
ऑनलाइन पद्धतीने कार्ड वाटा – आज कालच्या जगात वेडिंग कार्ड खूप सुंदर असायला हवे अशी अनेकांची अपेक्षा असते. यामुळे त्या कार्डवर लाखो रुपये देखील खर्चण्यात येतात. परंतु तुम्हाला जर एक शाही वेडिंग हवी असेल तर अशा गोष्टींवर वायफळ खर्च करू नका. तसेच यातून शिल्लक राहिलेले पैसे डेकोरेशनसाठी इतर गोष्टींसाठी खर्च करा.