शाहरुख आणि सलमानपेक्षा त्यांच्या डुप्लिकेट्सचं मार्केट मोठं, पाहाल तर तुम्हीही चकित व्हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आणि बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान या दोघांचेही समीकरण फारसे मिळते जुळते आहे का नाही तो विषय एका बाजूला पण दोघांचेही देशभरात करोडो चाहते आहेत. हे चाहते सोशल मीडियावर त्यांच्यासाठी कायम त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर या दोघांपेक्षा जास्त त्यांच्यासारख्या अगदी हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तींनी अगदी धुमाकूळ घातला आहे. कुणास ठाऊक उद्या शाहरुख आणि सलमानचे अख्खे मार्केट त्यांचे डुप्लिकेट खाऊन टाकतील. मुख्य म्हणजे या दोन्ही युवकांना पाहाल तर तुम्हीही चकित व्हाल कारण हे अगदीच डिट्टो शाहरुख आणि सलमान सारखेच दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CO5IprZAAu-/?utm_source=ig_web_copy_link

सध्या सोशल मीडियावर या दोन्ही डुप्लिकेटचे फोटो आणि व्हिडीओ जोरदार वायरल होत आहेत. त्यांना पाहिल्यावर नक्कीच तुम्ही खरा शाहरुख आणि खरा सलमान कोण अश्या संभ्रमातच पडाल. खोरोखरीच त्यांच्यात फरक करणे अत्यंत अवघड काम आहे.

https://www.instagram.com/p/CPqJm8XACvr/?utm_source=ig_web_copy_link

इंस्टाग्रामवर एक इब्राहिम कादरी नावाने अकाऊंट आहे. हा तरुण अगदीच हुबेहुब शाहरुख खान सारखा दिसतो आहे. शाहरुखच्या अनेक गाण्यांवर डान्स करतानाचे रिल्स देखील त्याने अकाउंटवर शेअर केले आहेत. इब्राहिमचे फोटो पाहून शाहरुखचे चाहतेही आश्चर्यचकीत झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CO9HGmHHsuU/?utm_source=ig_web_copy_link

तर इंस्टाग्रामवरच सुशांत खन्ना नावाने एक अकाउंट आहे. हा तरुण अगदीच हुबेहूब सलमान खान सारखा दिसतो आहे. या तरुणानेही सलमानच्या अनेक गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ बनविले आहेत. तर सलमानच्या अनेक प्रसिद्ध डायलॉगचेही त्याने रील बनवले आहेत.

https://www.instagram.com/p/COm179yH7kx/?utm_source=ig_web_copy_link

या दोन्ही तरुणांचे हे व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तर त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नसल्याचे सांगितले आहे. खरोखरच जगात एका चेहऱ्याची ७ माणसे असतात असे म्हटले जाते. पण इथे वास्तवातच खरोखर किमान सलमान शाहरुखचे एक एक झेरॉक्स सापडले आहेत.

Leave a Comment