अर्जेंटीना | कोल्हापुरच्या शाहु माने याने युथ आॅलम्पिक मधे सिल्वर मॅडल पटकावले आहे. युथ आॅलम्पक मधे महाराष्ट्राला मिळालेले हे पहिले मॅडल असून रायफल शुटींग या खेळ प्रकारात माने याला सदर मॅडल मिळाले आहे. १७ वर्षांचा माने हा इंडियन ज्युनिअर टीम साठी खेळत असून अभिनव बिंद्रा हे त्याचे आदर्श आहेत.
सुमा शिरुर या शाहु माने याच्या कोच आहेत. कोल्हापुर येथील महाराष्ट्र क्रिडा प्रबोधिनी चा माने हा खेळाडू आहे. अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या युथ आॅलम्पिक मधे शाहु माने याने सिल्वर मॅडल मिळवून देशाची शान वाढवली आहे.




