सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शाहुपुरी पोलिस स्टेशन जवळच रात्रीच्या सुमारास तुफान राडा झाला आहे. या राड्यात पिस्तूल, कोयते काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच दुचाकीची तोडफोड केल्याप्रकरणी संशयितांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये फिर्यादी सायली गाैतम रणदिवे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) या आहेत. फिर्यादित म्हटले आहे की, तीन दिवसापूर्वी फिर्यादीच्या जवळ मित्राची गाडी होती. सदरची गाडी बुधवार नाका येथील विजय कांबळे याने आडवून फोडली. त्याबाबतचा गुन्हा यापूर्वीच दाखल करण्यात आला आहे.
आपल्यावर गुन्हा दाखल केल्याच्या रागातून विजय कांबळे (बुधवार नाका, सातारा) याने व त्याच्या भावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या गुन्ह्यातील संशयित क्रातिसिंह नाना पाटील रूग्णालयात वैद्यकीय कारणांसाठी आहेत. या गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून अधिक तपास शाहूपुरी पोलिस करीत आहेत.