तसा कार्यक्रम 20 वर्षापूर्वीच झाला असता, पण “देर है लेकीन अंधेर नही” : छ. उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

तसा हा कार्यक्रम 20 वर्षापूर्वीच हा झाला असता, पण “देर है लेकीन अधेर नही”, त्याप्रमाणे या पाण्यापासून वंचित असणाऱ्यांना पाणी मिळणार आहे. ऐवढाच आज आनंद होत आहे. पण वाईट ऐवढेच वाटते हे पाणी 20 वर्षापूर्वीच मिळायला पाहिजे होते. आज या योजनेचा शुभारंभ झाला आहे, असे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी जाहीर केले.

सातारा शहरातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाहूपुरी (निमशहरी) नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी छ. उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे. तसा हा कार्यक्रम 20 वर्षापूर्वीच हा झाला असता. कण्हेर आणि 18 गावाचे अशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे 1999 साली माझ्या हस्ते भूमिपूजन झाले होते. शाहूपुरी, करंजे, कण्हेर धरणापासून सदरबझार, शिवराज पेट्रोलपंपाची मागील बाजूपर्यंतचा सर्व भागाचा समावेश होता. या परिसरासह 18 गावांना याचा लाभ झाला असता.

त्यावेळी या योजनेची किंमत 16 कोटी होती. त्यानंतर सत्तांतर झाले, मी विनवणी केलेली होती. सदरची योजना कार्यरत करावी. मूळ खर्च 31 कोटी रूपये होता, आता वाढला असून तो 42 कोटी रूपये झाला आहे. जीवन प्राधिकरण, एमईसीबी आणि ठेकेदार यांचे सहकार्य मिळाले असल्याचे छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी वसंत लेवे, सुधीर जाधव, संजय पाटील, राजेंद्र गिरीगोसावी, डी. जी. बनकर, महेश कुलकर्णी, बाळू ढेकणे यांच्यासह जीवन प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.