आरबीआयच्या गव्हर्नरपदी पुढील तीन वर्षांसाठी शक्तिकांत दास कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढवला आहे. २०१८ मध्ये दास यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ते २०२४ पर्यंत केंद्रीय बँकेचे गव्हर्नर राहतील. विशेष म्हणजे शक्तिकांत दास हे कार्यकाळाची मुदतवाढ मिळवणारे पहिलेच आरबीआय गव्हर्नर ठरले आहेत.

सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीत म्हटले आहे की, मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मुदतवाढ दिली आहे. 10.12.2021 पासून पुढच्या तीन वर्षांसाठी पुढील आदेश निघेपर्यंत ते गव्हर्नर असतील. त्यांना 11 डिसेंबर 2018 मध्ये तीन वर्षांच्या कालावधीकरता आरबीआयचे प्रमुख (गव्हर्नर) बनविण्या आले होते. त्यांनी अर्थ, कर आणि उद्योग आदी विषयात महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे

 

आरबीआय कायद्यानुसार, सरकार मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरची नियुक्ती करते. आरबीआय गव्हर्नरचा कार्यकाळ ५ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही, पण सरकारची इच्छा असेल, तर ते एका व्यक्तीला सलग दुसऱ्यांदा आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्त करू शकते.

Leave a Comment