हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shaktipeeth Expressway । गोवा ते नागपूर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र सरकारने २० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रकल्पाच्या आखणीसाठी तसंच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार कडून आज ८ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील इतरही महत्त्वाचे निर्णय- Shaktipeeth Expressway
1) महाराष्ट्र शक्तीपीठ (Shaktipeeth Expressway) महामार्ग – पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी ₹20 हजार कोटींच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
2) वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडावरील विस्थापितांसाठी द्यावे लागणारे ₹31 कोटी 75 लाखांचे शुल्क माफ. याठिकाणचे विस्थापितांचे अनिवासी व निवासी गाळे सार्वजनिक बांधकाम विभागास निशुल्क हस्तांतरीत होणार. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)#Maharashtra #CabinetDecisions #मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/b5tuWSSmcM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 24, 2025
3) आदिवासी शासकीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यामध्ये वाढ. दरमहा मिळणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यात दुपटीने वाढ, वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात भरीव वाढ. (आदिवासी विकास विभाग)
4) कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग) Shaktipeeth Expressway
5) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करून, आगामी अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक आणणार. (वित्त विभाग)
6) सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीतील तडजोडीसाठी सुधारणा विधेयक आणणार. (वित्त विभाग)
7) पिंपरी – चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मौ. चिखली येथील “दफनभुमी” च्या 1 हेक्टर 75 आर क्षेत्रापैकी 40% क्षेत्र (7000 चौ.मी.) मैला शुध्दीकरण केंद्रासाठी (STP) वापरण्यास मंजुरी. ( नगर विकास विभाग)
8) महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या ₹2000 कोटींच्या कर्जास शासन हमी देण्याचा, त्यापोटीचे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय. यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्यापोटीचे ₹822 कोटी 22 लाख, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 4 मलनि:सारण प्रकल्पासाठी ₹268 कोटी 84 लाख व मिरा-भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्यापोटीच्या ₹116 कोटी 28 लाखांच्या मागणीचा समावेश. ( नगरविकास विभाग )




