Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Shaktipeeth Highway : महाराष्ट्र शासनाने अनेक रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. राज्य सरकारचा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे गोवा ते नागपूर ‘शक्तिपीठ महामार्ग’. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या सर्वेक्षणाचे काम सध्या राज्यामध्ये युद्ध पातळीवर सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात आला आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) बाबत एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता शक्तिपीठ महामार्ग होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे दिली आहे. भूसंपादनासाठी निधी माझ्याच विभागाकडून जातो त्यामुळे मी निधी दिल्याशिवाय भूसंपादनाचा काम होणार नाही याबाबत मुंबईत गेल्यावर मी सविस्तरपणे माहिती घेईल. आवश्यकता असेल तर तुमच्या शिष्टमंडळाला बोलवेल (Shaktipeeth Highway) असंही पवार यांनी सांगितले.

एवढेच नाही तर कोल्हापूर दौऱ्यावर असताना शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी शिष्ट मंडळाने शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन चर्चाही केली आहे. शिवाय आपल्या मागण्यांचे निवेदनही (Shaktipeeth Highway) सादर केले आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे पाहायला मिळतंय. शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा अशी मागणी होत आहे. शिवाय मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे केवळ तोंडी स्थगिती देत असल्याचं सांगतात. पण दुसरीकडे शेतकऱ्यांना नोटीसा देत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

शेतकऱ्यांनी काळजी करू नये (Shaktipeeth Highway)

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की मी वेश बदलून दिल्लीला गेल्याच्या बातम्या चालल्या त्या खोट्या होत्या. तसंच ही पर्यावरण विभागाची बातमी ही खोटी आहे. शेतकऱ्यांना नोटिसा येत आहेत जर स्थगिती असेल तर नोटीसा का येतात? या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करता जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिफिकेशन दाखवलं. भूसंपादनाबाबत बोलताना पवार म्हणाले अर्थ खाते माझ्याकडे आहे. मी पैसे दिल्याशिवाय प्रकल्पच काय भूसंपादनही होऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं आश्वासन (Shaktipeeth Highway) अजित पवार यांनी दिला

शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे माझा देखील या शक्तीपीठ महामार्गाला ठाम विरोध आहे हा महामार्ग होणार नाही पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा कोणाकडे नाही असेही (Shaktipeeth Highway) त्यांनी म्हटले आहे.