भारताच्या ‘मानवी संगणक’ शकुंतला देवी यांची आज जयंती ; जाणून घेवूया शकुंतला देवींबद्दल महत्वाच्या गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ती शाळकरी मुलगी होती, त्या वेळची ही गोष्ट. जगात प्रज्ञेचा अर्क मानल्या जाणारा वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांची तिने भेट घेतली होती. आइनस्टाइन यांनी तिच्या गणिती कौशल्याची पारख करण्याचे ठरवले अर्थातच समोर एक फळा व खडू ठेवलेला होता. त्यांनी तिला एक अवघड असा गणिती कूटप्रश्न विचारला. त्यांनी तो प्रश्न विचारून संपवण्याच्या आत छोट्या शकुंतलाने त्याचे उत्तर फळ्यावर लिहिले होते अन् ते बरोबरही होते. फळा आकडय़ांनी भरून वाहत होता. आइनस्टाइन यांनाही तोंडात बोटे घालायला भाग पाडणाऱ्या त्या मुलीचे नाव शकुंतला देवी. शकुंतला देवींची आज जयंती ..शकुंतला देवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३९ मध्ये बंगलोर येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला, त्यांचे वडील सर्कशीत झोक्यावरचे खेळ सादर करायचे…

शकुंतलाचे गणिती कौशल्य बघून आइनस्टाइन चक्रावून गेला होता. तो म्हणाला, तुला जो कूटप्रश्न मी दिला, तो सोडवायला मला तीन तास लागतील व बाकी कुणा प्राध्यापकांना सोडवायला दिला तर किमान सहा तास लागतील, तू तर क्षणार्धात उत्तर दिलेस. याचे रहस्य काय, असे आइनस्टाइनने विचारले, त्यावर ती म्हणाली, “मी हे कसे करू शकते हे मला माहीत नाही.. पण माझ्या डोळ्यासमोर सतत आकडे तरळत असतात, अंतप्रेरणेने ते घडते

कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना शकुंतला देवी वयाच्या तिसऱ्या वर्षीच कोणतीही आकडेमोड झटक्यात आणि बिनचूक करू शकायच्या. त्यांच्या या कौशल्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. शकुंतला देवी यांनी लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये तेरा आकडी दोन संख्यांचा गुणाकार अवघ्या २८ सेकंदांत करून गिनीज बुकात नाव कोरले होते.

शकुंतला देवींनी गणितावर, ज्याोतिषशास्त्रावर पुस्तकं लिहिली. समलैंगिकतेविषयीचं भारतामधलं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं.मानवी संगणक’ हे नामाभिधान प्राप्त करणाऱ्या या शकुंतला देवी यांचं ८३ व्या वर्षी २१ एप्रिल २०१३ रोजी वृद्धापकाळाने निधन झालं.शकुंतला देवी यांना वन इंडियाकडून जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment