पुणे आयुक्तालयाबाहेर पेटवून घेणाऱ्या व्यक्तीच्या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करणार – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात एका व्यक्तीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत आता त्या व्यक्तीची तसेच या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत सातारा पोलीस दलातील एका कार्यक्रमात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे.

सातारा येथे कार्यक्रमप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांना महत्वाची माहिती दिली. मंत्री देसाई यांनी कार्यक्रमणानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात एका व्यक्तीने पेटवून घेण्याचा प्रकार झाला. या प्रकरणी 3 तक्रारी पैकी एका तक्रारी बाबत संबंधित पोलीस स्टेशनकडून आयुक्त कार्यालयाकडे माहिती येणे बाकी होते. मात्र, तरीदेखील संबंधित व्यक्तीने पुणे उपआयुक्त कार्यालयाबाहेर जाऊन पेटवून घेतले.

पुणे येथे घडलेल्या या घटनेची व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी उपायुक्तांमार्फत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणी माहिती मिळेल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

Leave a Comment