मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोरी केलेले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. देसाई यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त फेसबुकवर अभिवादनाची पोस्ट केली आहे. या पोस्टवर कमेंट बॉक्समध्ये शंभूराज देसाई यांना ट्रोल केले जात आहे. साहेब, शिवसेनेनं गृहराज्यमंत्री पद देवून तुमच्यावर अन्याय केला. आता माजी लावायची सवय लावून घ्या, अशा कमेंट करत ट्रोल केले आहे. देसाई यांच्या फेसबुक पोस्ट वर मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं अशा कमेंट करत खास सातारी शैलीत शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केला आहे.

काय आहे शंभूराजे देसाई यांची पोस्ट-

लोककल्याणकारी धोरणांतून सामाजिक समतेची वाट विस्तारणारे आधुनिक लोकराजा, करवीर संस्थानचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन! कणखर बाणा दाखवत लोककल्याणाची पावले त्यांनी उचलली. त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील. अशी पोस्ट शंभूराजे देसाई यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या फोटो सोबत शिवसेनेचे चिन्ह आणि मंत्रीपदांचा उल्लेख केला आहे.

शंभूराजे देसाई यांच्या या फेसबुक पोस्ट वर जोरदार कमेंट पाहायला मिळत आहे. अनेक जणांनी त्यांना ट्रोल करत माजी आमदार लिहायला सुरुवात करा, सवय लावून घ्या, अस म्हंटल आहे. तर काही जणांनी त्यांना गद्दार म्हंटल आहे. महाविकास आघाडीने दिलेलं मंत्रिपद काढुन फोटो लावा असाही सल्ला काही जणांनी दिला.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे 40 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. सध्या हे सर्व बंडखोर आमदार आसाम येथील गुवाहाटी येथे असून महाराष्ट्र राज्यातील राजकारण नाट्यमय घडामोडींनी वळण घेत आहेत. अशा वेळी बंडखोर आमदारांच्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता या बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षाचे चिन्ह वापरू नये, तसेच शिवसेनेना पक्षामुळे मिळालेली पदे ही काढून घेतली जातील. त्यामुळे आता माजी लावायची सवय लावून घ्या, अशा कमेंट्स सोशल मीडियावर, फेसबुकवर पडत आहेत.

अनेकांनी शंभूराज देसाई यांना ट्रोल करताना. काही कमेंट मध्ये म्हटलं आहे, साहेब, शिवसेनेनं खुप खुप अन्याय केला आहे तुमच्या वर गृहराज्यमंत्री करून शिवसेनेचे नाव चिन्ह आपल्या पोस्ट मध्ये वापरु नये. प्रहार या जगप्रसिध्द पक्षाचे किंवा जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे चिन्ह वापरावे. तसेच महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला…तर आता आघाडीने दिलेले मंत्रीपद काढा… राजे आपणास राष्ट्रवादी सोबत सत्ता नको म्हणून पळून गेलात,मग त्याच सत्तेतले पद आपण का लावत आहात.

पहिली बंडखोरी शंभूराजे देसाई यांची?

दरम्यान, शिवसेनेतून पहिली बंडखोरी शंभूराजे देसाई यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोर आमदार शहाजी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये सुरत मध्ये सर्वप्रथम पाऊल ठेवणारे शंभूराजे देसाई आणि शहाजी पाटील होते अस ते आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगत असल्याचे दिसत आहेत.

 

Leave a Comment