कोयनानगरला पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजुर; पाटणला 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघाकरिता नुकत्याच झालेल्या सन 2021-22 च्या अर्थसंकल्पातून 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. पाटण मतदारसंघात त्यांनी दर्जोन्नती मिळवून दिलेल्या ग्रामीण भागांना जोडणार्‍या महत्वाच्या मोठ्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 94 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी तर पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता 11 कोटी 87 लक्ष व पाटण न्यायालयाच्या अतिरिक्त बांधकामासाठी 1 कोटी 50 लक्ष निधी मंजुर करुन घेतला आहे.तसेच त्यांनी विधानपरिषद सभागृहात काल सन 2021-22 चा अर्थसंकल्प मांडताना पाटण मतदारसंघातील कोयनानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्यास शासनाची मान्यता घेत याची घोषणा करुन पाटण मतदारसंघाच्या वैभवात भर टाकली आहे.

सन 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात मंजुर झालेल्या कामांचा व मंजुर निधींचा तपशील जिंती ते निगडे रस्ता प्रजिमा 121 भाग 0/00 ते 5/00 किमी 05 कोटी 60 लक्ष, त्रिपुडी ते कवरवाडी रस्ता प्रजिमा 123 भाग 0/00 ते 5/00 किमी 04 कोटी, बेलवडे ते सुळेवाडी रस्ता प्रजिमा 124 भाग किमी 0/00 ते 4/00 02 कोटी 50 लक्ष, बनपूरी ते नाईकबा रस्ता प्रजिमा 125 भाग 0/00 ते 5/00 किमी 03 कोटी, डाकेवाडी ते वाझोली फाटा रस्ता प्रजिमा 121 भाग 18/00 ते 23/00 किमी 04 कोटी, भोसगाव ते आंब्रुळकरवाडी रस्ता प्रजिमा 122 भाग 0/00 ते 2/500 किमी 02 कोटी, रिसवड ते ढोकावळे रस्ता प्रजिमा 123 भाग 21/500 ते 26/00 किमी 03 कोटी 40 लक्ष, सुळेवाडी ते शिंदेवाडी रस्ता प्रजिमा 124 भाग 4/00 ते 8/400 किमी 04 कोटी 40 लक्ष, शिंदेवाडी ते कुसरुंड रस्ता प्रजिमा 124 भाग 8/400 ते 12/600 किमी 04 कोटी 20 लक्ष, काटेवाडी ते मुरुड रस्ता प्रजिमा 128 0/00 ते 7/00 किमी 03 कोटी 50 लक्ष, कोंजवडे ते कडवे खुर्द रस्ता प्रजिमा 129 0/00 ते 5/00 किमी 01 कोटी 50 लक्ष, गमेवाडी ते पाडळोशी रस्ता प्रजिमा 130 0/00 ते 8/00 किमी 03 कोटी, सडावाघापूर ते खंडूआईचे मंदिर रस्ता प्रजिमा 37 26/300 ते 38/00 किमी 01 कोटी 50 लक्ष, चाफळ फाटा ते गमेवाडी रस्ता प्रजिमा 53 किमी 0/00 ते 6/500 02 कोटी 70 लक्ष, निसरे फाटा ते निसरे गाव व मारुलहवेली ते कोरिवळे रस्ता प्रजिमा 54 किमी 0/00 ते 1/00 व 7/500 ते 8/500 01 कोटी 50 लक्ष, चव्हाणवाडी ते घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 23/500 ते 33/500 05 कोटी, गलमेवाडी ते तालुकाहद्द रस्ता प्रजिमा 56 किमी 7/00 ते 9/00 01 कोटी 50 लक्ष, नवजा हेळवाक गोवारे मोरगिरी गारवडे साजूर विंग वाठार रस्ता रामा 148 किमी 58/800 ते 60/300 ची सुधारणा करणे03 कोटी व नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 वर किमी 1/120 मध्ये कोयना नदीवर सांगवड गावाजवळ मोठया पुलाचे बांधकाम करणे 18 कोटी तसेच चरेगाव चाफळ डेरवण दाढोली चोपडी नाटोशी रस्ता प्रजिमा 53 किमी 21/100 मध्ये कोयना नदीवर त्रिपुडी गावाजवळ मोठया पुलाचे बांधकाम करणे 20 कोटी, पाटणला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता 11 कोटी 87 लक्ष व पाटण न्यायालयाच्या अतिरिक्त बांधकामासाठी 1 कोटी 50 लक्ष असे एकूण 107 कोटी 67 लक्ष रुपयांचा निधी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध महत्वाच्या कामांना राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजुर झाला आहे.

राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना राज्याच्या अर्थसंकल्पात भरघोस निधी देवून मतदारसंघाला न्याय मिळवून दिलेबद्दल पाटण मतदारसंघातील जनतेने त्यांचे आभार मानले आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment