Monday, January 30, 2023

लज्जास्पद! क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहितेसोबत पोलिसाचे गैरवर्तन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहित मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही महिला आपल्या पतीसह दिल्लीहून किच्छा येथे परत आली होती. तेथे त्यांना पुलभट्टा परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. हे प्रकरण वाढल्याचे पाहून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत पोलिस उपअधीक्षक सुरजितसिंग म्हणाले की, ‘ या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यावर तहरीरच्या आधारे गुन्हा दाखल करण्यासाठी कारवाई केली जात आहे.’

काय आहे हे संपूर्ण प्रकरण
किच्छाच्या पुलभट्टा भागातील सूरजमल संस्थेत क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. दिल्लीहून परत आलेल्या या नव्या जोडप्यासही येथे ठेवण्यात होते. त्यावेळी ड्युटीवर असलेला एक पोलिस कर्मचारी दारूच्या नशेत या नवदांपत्याकडे पोहोचला आणि त्यानंतर तो त्या नवविवाहितेचा हाथ पकडून तिला खालच्या मजल्यावरील खोलीत घेऊन येऊ लागला. जेव्हा नवरा-बायकोने त्याला विरोध केला, तेव्हा तो कर्मचारी म्हणाला की,’ स्त्रियांसाठी खाली राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे, तेव्हा तिला माझ्याबरोबर खाली यावे लागेल. जेव्हा त्या नवविवाहितेने तेथे जाण्यास नकार दिला, तेव्हा आरोपी पोलिसाने त्या महिलेवर हल्ला करुन तिचे कपडे फाडले. पोलिस कर्मचाऱ्याच्या या कृत्याला घाबरून संबंधित महिलेने तेथून पळ काढला आणि तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला.

- Advertisement -

पोलिस कर्मचारी निलंबित , कारवाई केली जाणार
या प्रकरणात किच्छाचे आमदार राजेश शुक्ला यांनी आक्षेप घेत म्हटले की,’ या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. त्यांनी पीडितेच्या कुटूंबाला आश्वासन देत या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. त्याचवेळी, पोलिस उपअधीक्षक सुरजित सिंह म्हणाले की, ‘ या आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला बरखास्त करण्यात आले आहे. त्याच्यावर तहरीरच्या आधारे गुन्हा नोंदविण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.