लज्जास्पद! वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

बाप लेकीच्या अत्यंत पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना परभणी जिल्ह्यातील किन्होळा येथे घडली असून वडिलांनीच स्वतःच्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचे घृणास्पद कृत्य केलयं. नराधम पित्याला न्यायालयाने आता दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या किन्होळा या गावातील दीपक संपत वावळे असे आरोपीचे नाव आहे. शनिवार ४ जुलै च्या रात्री अकरा वाजता घरात पती-पत्नी व मुलगी झोपलेले असताना व यावेळी पत्नी बाहेर गेल्याचे पाहून नराधम पित्याने स्वतःच्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडलीेय. याप्रकरणी सोमवार ६ जुलै रोजी पहाटे रात्री १ वाजता पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पाथरी पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायदा पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे .

सदरील आरोपीला मंगळवार ७ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहीती पाथरी पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणाचा तपास पाथरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी .आर. तिप्पलवाड करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment