‘निसर्ग’ चक्रीवादळ नुकसान पाहणीसाठी शरद पवार उद्यापासून २ दिवस कोकण दौऱ्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शरद पवार हे २ दिवस कोकण दौरा करणार आहेत. आपल्या कोकण दौऱ्यात शरद पवार रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्गग्रस्त रायगड जिल्ह्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यासाठी तातडीची १०० कोटींची मदत जाहीर केली.

असा असेल दौरा
शरद पवार दिनांक ९ जून रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईतून गाडीने प्रयाण करणार आहेत. सकाळी ११. ३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे मुक्काम करणार आहेत. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment