शरद पवार रुग्णालयात दाखल; 3 दिवस उपचार घेणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहे. उपचारासाठी पवार रुग्णालयात दाखल झाले असून ३ दिवस ते उपचार घेणार आहेत. शरद पवार अचानकपणे रुग्णालयात दाखल का झाले याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल.

shivajirav garje

३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आलं आहे.