व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘चिंता नको मी राष्ट्रवादीतच’ म्हणणार्‍या अजित पवारांना शरद पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपसोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत तो अजित पवारांचा वयैक्तिक निर्णय असलंयाचं सांगत राष्ट्रवादीची भुमिका स्पष्ट केली.

आता काका पुतण्या असं वाॅर ट्विटरव रंगलं आहे. काही वेळापुर्वी अजित पवार यांनी चिंता करु नका मी राष्ट्रवादीतच आहे. आणि राष्ट्रवादीतच राहणार आहे असं सांगत भाजप राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रात कायम राहिल असे ट्विट केले होते. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. यावर आता शरद पवार यांनी ट्विट करत अजित यांना प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अजित पवार यांचे विधान चुकीचे असून दिशाभूल करणारे असल्याचा आरोपदेखील शरद पवारांनी केला आहे.

दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील ट्विटरवाद आता चांगलाच रंगला आहे. यासर्वघडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत आणि नेत्यांमध्ये मात्र चांगलीच संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –