…म्हणून फक्त 13 महिन्यात वाजपेयींच सरकार कोसळलं; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

0
2
Sharad Pawar and Atal Bihari Vajpayee
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभेचे विरोधी पक्षनेते शरद पवारांनी (Sharad Pawar) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee ) यांच्याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पत्रकार निलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा: आठवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान वाजपेयी यांना राजीनामा का द्यावा लागला या विषयी भाष्य केले आहे. तसेच, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १९९९ मध्ये केवळ १३ महिन्यात कोसळल होत याचं कारण त्यांनी सांगितल आहे.

शरद पवार यांनी सांगितले की, “माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला. हा ठराव एक मतानं मंजूर झाला. आता ते मत कसं मिळवलं मी सांगत नाही. अविश्वासदर्शक ठराव मांडून चर्चेची वेळ असते. त्या वेळेत मी बाहेर जाऊन कोणाशी तरी बोलून परत येऊन बसलो. सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीनं काही वेगळा निर्णय घेतल्यानं एका मतानं सरकार पडलं.”

यावेळी बोलताना शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या नाराजीबाबत भाष्य केले. शरद पवार म्हणाले की, “गेले दहा-बारा दिवस संजय राऊतांची आणि माझी गाठ नव्हती. साधारणतः आमची रोज गाठ-भेट होते. आम्ही दोघे भेटणार असल्याचे बातमी चालविली जात होती. एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील.”

त्याचबरोबर, “संजय राऊत यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या समवेत घालवला, त्यांच्याकडून ते शिकले. अशा सगळ्या विचारांचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत. ते व्यापकच विचार करतील. बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक आगळं वेगळं रहस्य होतं. सगळे गेल्यानंतर त्यांच्याकडे जे-जे शब्द होते त्या शब्दांचा प्रयोग करून आमच्यावर ते आपली आस्था दाखवायचे.” अशा आठवणी शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी सांगितल्या.