शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; देशात मोठ्या हालचाली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असताना INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपप्रणीत NDA २९० जागांवर आघाडीवर आहे तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३५ जागांवर आघाडीवर आहे. निकालाचे एकूण कल पाहता जास्तीत जास्त नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा आणि फोनाफोनी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) याना फोन लावला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी नितीशकुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नितीशकुमार यांना INDIA आघाडीत येण्याची विनंती करण्यात येणार आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या JDU १२ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे नितीशकुमार यांचे महत्व वाढलं आहे. इंडिया आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांच्या पाठिंब्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी नितीश कुमारांना फोन केल्याचं बोललं जात आहे. नितीशकुमार याना INDIA आघाडीकडून उपपंतप्रधान करण्यात येईल असेही म्हंटल जात आहे. नितीशकुमार यांच्याशिवाय चंद्राबाबू नायडू यांनाही इंडिया आघाडी सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे.

दरम्यान ,नितीश कुमार यांचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता ते कधीही पलटी मारु शकतात. त्यामुळे आताही राजकीय परिस्थिती पाहून नितीशकुमार पुनः एकदा इंडिया आघाडीसोबत जाणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. यावर जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी प्रतिक्रिया देत म्हंटल कि, आम्ही कुठेही जाणार नाही, जिथे आहोत तिथेच राहणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र नितीशकुमार कधी काय करतील? कोणती भूमिका घेतील याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा शक्य नाही हे सुद्धा नाकारता येत नाही.