व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सरकारने धरणांवर खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांना ठिबक सिंचन पुरवावं – शरद पवार

सातारा प्रतिनिधी | पाण्याचा प्रश्न पाहता सरकारने शेतकर्‍यांना ठिबक सिंचनाची सुवधा पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील के. एम. शुगर साखर कारखान्याच्या २ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्याचे पुजन आज पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने ठिबक सिंचन सुविधा पुरवण्याची मागणी केली.

पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. १ एकर ऊसाला पाटाने पाणी देताना बरेच पाणी वाया जाते. ठिबक सिंचन पद्धतीने ३ एकर शेतीला या पाण्याचा लाभ होतो. मात्र हे खर्चिक असल्याने माझी सरकारला मागणी आहे की धरणावर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना पुरवण्याचे काम करावे असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला.

दरम्यान साखर उत्पादक शेतकर्‍यांपुढे पाण्याचा मुख्य प्रश्न असतो. यावर तोडगा काढण्यासाठी शेतकर्‍यांना ठिबक सिंचन योजना पुरवणे गरजेचे आहे. लहान शेतकर्‍यांना ठिबक बसवणे परवडत नसल्याने सरकारने शेतकर्‍यांना ठिबक पुरवण्याचा सल्ला पवार यांनी दिला आहे.