Wednesday, February 1, 2023

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तब्बल ८ दिवस शरद पवार हॉस्पिटल मध्ये होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. आज सकाळी साडे दहा वाजता शरद पवार मुंबईतील आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी रवाना झाले.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते . रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार दिला जाणार होता. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. त्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती.

आजारी असतानाही पवार शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात –

- Advertisement -

दरम्यान, रुग्णालयात असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबिरात हजेरी लावली होती. यावेळी पवारांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आलं होतं. शरद पवारांनी अवघ्या ५ मिनिटाचे भाषण करत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला मात्र यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. तसेच आवाजही क्षीण येत होता. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पवारांचे भाषण वाचून दाखवले.