हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केल्याने अमित सुरवसे या युवकाने पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती. दरम्यान अमित पोलिसांच्या ताब्यात असून तो शरद पवारांचा मोठा चाहता असल्याचे समजते.
अमित सुरवसेच्या छातीवर शरद पवारांचे छायाचित्र असलेला टॅटू आहे. त्यामुळे अमित हा शरद पवारांचा कट्टर समर्थक आहे हे स्पष्ट आहे. यापूर्वी अमितचा रोहित पवारांसोबतचा एक फोटोदेखील पडळकरांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अमित तब्बल 3 दिवसांनी पोलिसांना सापडला. हिप्परगा परिसरातील एका शेतातील झाडाखाली अमित आणि त्याचा मित्र दोघेही पोलिसांना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याकडून बॉण्ड लिहून घेऊन सोडून दिले. आता त्यांना न्यायालयातून जामीन घ्यावा लागणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली