शरद पवार राजकारणातील सोंगाड्या, उध्दव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । शरद पवारांची राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी झाली असून शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज करमाळा येथे जाहीर सभेत बोलताना केली.

करमाळा येथील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार रश्मी बागल यांच्या प्रचार सभेसाठी ते आज येथे आले होते. शिवसेनेने गरीबांसाठी १० रूपयात थाळीचे जेवण देण्याचे आश्वासन दिले याबाबत पवारांनी टीका केली होती. पवार यांच्या वक्तव्याचा उद्धव यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला.

पवार यांच्यावर पलटवार करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘होय मी स्वयंपाकी आहे जनतेसाठी मी कोणतीही काम करायला तयार आहे. पण स्वयंपाकासाठी अजित पवारांचं पाणी तेवढ नको. असा पलटवार ही त्यांनी केला. राज्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व फक्त नावा पुरतं उरलं आहे. गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीचे किती तुकडे झाले हे मोजता देखील येणार नाहीत. अशी चपराक ही ठाकरे यांनी मारली.

Leave a Comment