तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीआधी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या कुटुंबात सगळं आलबेल असल्याचं बोललं जात होतं. यानंतर निवडणुका झाल्या आणि सहानुभूतीच्या लाटेवर का होईना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला सरकार स्थापण्यापासून रोखलं. शनिवारी सकाळी मात्र महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी भाजपसोबत अधिकृतरित्या घरोबा केला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर शरद पवार यांचा यामागे हात आहे का या चर्चांना उधाण आलेलं असताना शरद पवार यांनी मात्र अजित पवार यांचा निर्णय हा वैयक्तिक असल्याचं सांगितलं आहे.

मात्र राज्याच्या राजकारणाची जाण असलेल्या शरद पवारांना या बंडखोरीची अजिबातच जाण नसावी यावर अजून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास बसत नाहीये. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या व्हाट्सअप्प स्टेट्सला पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याचं सांगितल्यामुळे आता शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणं आवश्यक ठरणार आहे.

शरद पवार जर अजित पवारांवर कारवाई करू शकले नाहीत तर ते महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत अशी भावना आता सामान्य लोकांतून व्यक्त होत आहे. आता केवळ ट्विट करून भागणार नाही तर कारवाई करून दाखवली पाहिजे अशी मागणी संतप्त जनतेतर्फे होत आहे. यावर शरद पवारांची अधिकृत टिप्पणी शनिवारी दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळेल.

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment