Wednesday, October 5, 2022

Buy now

“भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही एक तक्रार आली होती, त्यावेळी मी फडणवीसांना…”; शरद पवारांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचे राजकारण तापले असून काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केला. यावरून शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला. “भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा, असे मी देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणे योग्य नसते म्हणून मी फडणवीसांकडे ही तक्रार दिली होती,” असा गौप्यस्फोट पवार यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. यावेळी शरद पवार यांनीही अनेक खुलासे करत गौप्यस्फोट केले. यावेळी पवार म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीस यांनी जे कहाणी आरोप केले आहेत. त्या त्याच्या आरोपांची राज्य सरकारकडून चौकशी करण्यात यावी, अशी मीही मागणी करत आहे. माझ्याकडेही असे फडणवीसांच्या विरोधात बोलण्यासाठी खूप काही आहे.

भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. आणि तीही फडणवीस यांच्याच सहकाऱ्याची तक्रार आली आहे. त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं. एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसतं. म्हणून मी फडणवीसांकडे ही तक्रार दिली होती.

सहा महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत माझ्याकडे तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही, असे पवार यांनी सांगितले.