शरद पवार- गृहमंत्री वळसे पाटील भेट; मुंबई पोलीस आयुक्तांनाही बोलावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या भेटीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक वर जाऊन पवारांशी चर्चा केली होती. त्यामुळे राजकीय तर्क वितर्काना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

पवार- वळसे पाटील भेटीत मुंबईतील ड्रग्ज प्रकरण, हायव्होल्टेज आर्यन खान ड्रग्ज केस, अनिल देशमुख यांना ईडी कडून झालेली अटक या सर्व विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती कळतीय. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

त्यातच आर्यन खान ड्रग केस नंतर नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर आरोप करत आहेत. तसेच समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक यांचा सामना दररोज सुरु आहे. पत्रकार परिषदांच्या सिलसिल्याच्या माध्यमातून दररोज आरोप प्रत्यारोपांची राळ उडतीय. याच सगळ्या अनुषंगाने पवार-वळसे पाटील- मुंबई पोलीस आयुक्त यांच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

You might also like