Saturday, January 28, 2023

शरद पवार राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला

- Advertisement -

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनीच पवार यांना भेटीचे आमंत्रण दिले असल्याचे समजत आहे. पवार नुकतेच राजभवन मध्ये पोहोचले असून त्यांच्यात चर्चा आहे.

सध्या राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन सरकारबाबत तक्रार करताना दिसत आहेत. तसेच नुकतेच राज्यपालांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारला निर्णय घेण्याचे सुचवल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, शनिवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. आपली हि भेट सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र राऊत यांच्या राज्यपाल राजकीय वर्तुळांत मात्र उलट सुलट चर्चाना पेव फुटला होता. आता शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने सर्वांचे या भेटीत काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.