भीमा कोरेगाव प्रकरणामागील सत्य बाहेर येईल या भीतीने तपास NIAकडे – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणामागील सत्य बाहेर येईल या भीतीने भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. तसेच अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे नक्षलवाद नव्हे असेही पवार म्हणाले. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. SIT चौकशीच्या मागणीनंतर पाच तासात केंद्राने तपास काढून घेणं संशयास्पद असल्याचं ते म्हणाले.

शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर लगेच केंद्राने हे प्रकरण NIA कडे म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेकडे वर्ग करत असल्याचे महाराष्ट्र सरकारला कळवले. यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राच्या या निर्णयावर जोरदार टीका केली.

Leave a Comment