एसबीआय ग्राहकांसाठी खास सुविधा, आता डेबिट कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी व्हर्च्युअल कार्ड (SBI Virtual Card ) सुविधा आणली आहे. ग्राहकांना यापुढे ऑनलाइन खरेदीसाठी प्लास्टिक कार्डची आवश्यकता भासणार नाही. ग्राहकांकडे व्हर्च्युअल कार्ड असल्यामुळे हे कार्ड गमावण्याची त्यांना भीती वाटणार नाही. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक कार्डची सर्व वैशिष्ट्ये यात उपलब्ध असतील.

चला तर जाणून घेऊया या कार्डच्या वैशिष्ट्यांविषयी

१. एसबीआय व्हर्च्युअल कार्डच्या मदतीने ग्राहक त्यांच्या खात्याच्या तपशीलांची माहिती गुप्त ठेवू शकतील. त्यामुळं आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.

२. एसबीआय व्हर्च्युअल कार्डची वैधता ४८ तास असेल. तोपर्यंतच तुम्हाला हे कार्ड वापरता येणार आहे.

३.या कार्डची निर्मिती व व्यवहार प्रक्रिया केवळ ओटीपीच्या मदतीने करता येईल. हा ओटीपी फक्त नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल.

४.एसबीआय ग्राहक त्यांच्या नेट बँकिंगद्वारे पेमेंट करू शकतील.

un (30)

५.एसबीआय व्हर्च्युअल कार्डसाठी किमान व्यवहार मर्यादा १०० रुपये असेल आणि कमाल मर्यादा ५०,०००असेल.

६. एसबीआय व्हर्च्युअल कार्ड ऑनलाइन व्यापारी साइटवर वापरता येईल. ज्या ठिकाणी व्हिसा कार्ड स्वीकारली जात असतील तिथेच या कार्डचा वापर तुम्ही करू शकाल.

७.एसबीआयचे हे व्हर्च्युअल कार्ड सिंगल युज असणार आहे. याचा अर्थ असा कि, या कार्डचा वापर तुम्हला केवळ एका व्यवहारासाठी करता येणार आहे.

८. आपली खरेदी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावरच या कार्डमधून रक्कम वजा केली जाईल.

SBI Virtual Card क्रिएट करण्यासाठी खालील सूचना पाळा

>> यासाठी प्रथम एसबीआय बँकिंग खाते पोर्टलवर लॉगिन करावे लागेल.

>> यानंतर तुम्हाला ‘e-card’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. हा पर्याय वेबसाइटच्या वरच्या पट्टीवर देण्यात येईल.

>> त्यानंतर तुम्हाला ‘generate virtual card’  टॅबवर क्लिक करावे लागेल.

>> आता, आपल्या virtual cardमध्ये तुम्हाला जितकी रक्कम ट्रान्स्फर करायची आहे ती रक्कम टाका.

>> पुढील चरणात, नियम व शर्ती तपासल्यानंतर तुम्हाला  generate पर्यायावर क्लिक करावे लागेल
यानंतर आपल्याला कार्डधारकाचे नाव, डेबिट कार्ड खाते क्रमांक आणि virtual card मर्यादा verify करावी लागेल.

>> आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर 0TP पाठविला जाईल.

>> हे OTP भरल्यानंतर तुम्हाला कन्फर्म बटणावर क्लिक करावे लागेल.

यशस्वी वैलिडेशन नंतर, कार्ड नंबरसह कार्ड नंबर, expiry date इत्यादी माहिती आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा एकदा घसरण; गाठला महिनाभराचा नीचांक

तब्बल ५ महिन्यांनंतर जम्मू काश्मीरमध्ये २जी इंटरनेट सेवा सुरू; सोशल मीडियावर अजूनही बंदी

आयकर नियमात नवीन बदल; ‘या’ २ गोष्टींची माहिती न दिल्यास कंपनी तुमचा पगार कापणार

Leave a Comment