माढातून लोकसभा लढवण्याबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? याबाबत राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांत सुरु असताना आता खुद्द पवार यांनीच याबाबत मोठे विधान केले आहे.  “मी माढा लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढावी असा आग्रह राष्ट्रवादीच्या माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांनी धरला आहे” असे वक्तव्य पवार यांनी केले आहे. पुणे येथील बारामती होस्टेल मध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आपण माढा मधून लोकसभा लढवणार आहात काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता “माझ्या प्रमुख सहकार्यांनी माढा लोकसभा मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनीही मला आपण माढातून लोकसभा लढवण्याचे सुचवले आहे.” अशी माहिती दिली. तसेच “मी माझ्या सहकार्यांच्या आग्रहावर विचार करेन” असे म्हणून पवार यांनी मधातून निवडणूक लाध्व्ण्यासंदर्भात सुतोवाच केले. 

‘आम्ही तुमचे सगळे एकतो..तुम्ही आमचं एवढ एका’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना माढातून लोकसभा लढवण्यास आग्रह केला असल्याची माहिती पवार यांनी दिल्याने आता शरद पवार मधातून निवडणूक लढणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार

राज ठाकरे आघाडीत राहतील, छगन भुजबळ यांचे संकेत

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment