शरद पवारांच्य‍ा पत्रकार परिषदेतील महत्वाचे ५ मुद्दे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांनी देशाती आणि राज्यातील महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. शरद पवार यांच्या पत्रकर परिषदेतील महत्वाचे पाच मुद्दे खालीलप्रमाणे

१) पोलीसांची सुरक्षितता – आठवडाभरापूर्वी मुंबईत पोलीसांवर जमावाकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबाबत पवार यांनी पोलीसांची सुरक्षितता एरणीवर आल्याचं म्हटलं आहे. देशातील सर्वच राज्यांत पोलिसांची अवस्था बिकट आहे. पोलीसांना ८ तासांहून अधिक काम करावे लागते. तसेच आठवड्याची सुट्टीही पोलिसांना मिळत नाही. अशा परिस्थितीत पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात. पोलीसांवर हल्ला होणं ही गांभिर्याची बाब आहे. केंद्राने यात लक्ष घालणं गरजेचं आहे. असं पवार म्हणाले.

२) अतिवृष्टीचा शेतकर्‍यांना फटका – राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असल्याचं पवार यांनी सांगितले. मी राज्यात फिरलो तेव्हा शेतकर्‍यांना विशिष्ट आर्थिल मदतीची, काही प्रमाणात कर्जमाफीची आणि बँकांकडून कर्जपूरवठा उभारण्याची गरज शेतकर्‍यांनी मला बोलावून दाखवली आे पवार म्हणाले.

३) विमा कंपण्यांचा भोंगळ कारभार – शेतकरी विमा काढतात मात्र विमा कंपण्या आपली जबाबदारी पार पाडायला तयार नाहीत. केंद्र सरकारने विमा कंपण्यांची बैठक बोलावून त्यांना तशा सुचना देणे गरजेचे आहे असे पवार यांनी म्हटलं आहे.

४) अयोध्या निकाल – अयोध्या प्रकरणाचा निकाल लागणार असून तारीखही जवळपास निश्चित होत आहे. अशात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे. बाबरी मस्जिद हल्ला झाला तेव्हा देशात जी परिस्थिती निर्माण झाली होती स्थिती येऊ नये यासाठी पवार यांनी आवाहन केले.

५) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण – राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखे अद्याप काही नाही. जनतेने भाजप शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. त्य‍ांनी राज्यातील स्थिती पूर्ववत करावी असं पवार म्हणालेत. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत पवार य‍ांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. तसेच जनतेने आम्हाला विरोधीपक्षात बसवलं असून आम्ही विरोधीपक्षाची भुमिका योग्य पद्धतीने पार पाडू असंही पवार म्हणालेत. आपण मुख्यमंत्री होण्यास तयार होता काय असं एका पत्रकाराने विचारले असता मी चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे. आता मला मुख्यमंत्री करा यासाठी मी कधीही आग्रही नव्हतो असं म्हणत या चर्चा म्हणजे प्रपोगंडा आहेत असे पवार म्हणाले.

Leave a Comment