या चर्चेमागे दडलंय काय? शरद पवार,पृथ्वीराज चव्हाण यांच्यात व्यासपीठावरच चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सत्तास्थापनेसाठी मुदत अगदी जवळ आली असताना शिवसेना आणि भाजपा मधील युतीचा प्रश्न काही निकाली लागण्याची शक्यता दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर ठाम असून त्यामुळे सत्ता स्थापनेची शक्यता धूसर बनत चालली आहे. दोन्ही पक्ष सरकार स्थापन होईल असे म्हणत असले तरी त्याचा मुहूर्त कधी लागणार याची सर्व वाट पाहत आहेत. विरोधी पक्षांनी पाठिंब्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मात्र आगामी काळात सत्तेची समीकरणे कशी बदलतात हे पाहून महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आज आघाडी मधील दोन दिग्गज नेते चक्क व्यासपीठावरच चर्चा करत असल्याचे समोर आले. निम्मित होते यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळ्याचे. थोर विचारवंत, माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांचे ७ नोव्हेंबर २०१९ – ७ नोव्हेंबर २०२० हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यशवंतराव मोहिते यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विधीमंडळाच्या कामकाजात मोठे योगदान दिले आहे. कृष्णाकाठावर ही त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून गुरुवारी जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई  पाटील, शरद पवार , पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील इ. दिग्गज मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्वांच्या हस्ते त्यांच्या कार्याचे महत्व सांगणाऱ्या चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण शेजारी-शेजारी बसले होते. कार्यक्रमामध्येच दोघांमध्ये तब्बल दहा मिनिटे चर्चा चालू होती. यावेळी सर्वांच्या नजरा दोघांवर खिळल्या होत्या. मात्र राज्यातील राजकीय स्थितीवरच दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात दोघांच्या चर्चेचा राज्याच्या सत्ता समीकरणात काय प्रभाव पडतो हे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment