उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचे शरद पवारांनी केले स्वागत म्हणाले…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : (सकलेन मुलाणी) हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी देशातील आणि राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्याचा सपाटाच लावला आहे. हे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून भाजपाचे प्रवक्ता आणि आमदार यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी घेतलेल्या या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कौतुक केलं आहे. “उदयनराजेंनी चांगली भूमिका घेतली आहे. त्यांच्याबद्दल आम्हा लोकांना समाधान आहे. पण, राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका बघ्याची आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

तसेच “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले उद्गार चुकीचे होते. मला खात्री आहे, आज ना उद्या केंद्र सरकारला त्यांच्याबाबत निर्णय निर्णय घ्यावा लागेल. लवकरच तो बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल,” अशी अशा शरद पवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या