राजकारणात ज्याला समज आहे, त्यालाच महत्व द्यावं; पवारांनी केसरकरांना फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केल्यांनतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर तुटून पडली होती. आज खुद्द शरद पवार यांनाच केसरकरांच्या या आरोपा बाबत विचारलं असता पवारांनी अत्यंत मोजक्या शब्दात त्यांच्या आरोपाचा निकाल लावला. राजकारणात ज्याला समज आहे, त्यालाच महत्व द्यावं असा टोला पवारांनी लगावला .

शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर असून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना केसरकरांनी केलेल्या आरोपावर विचारलं असता पवार म्हणाले, राजकारणात ज्याला समज आहे, त्यालाच महत्व द्यायच असत. कोण बोलतं हे ही महत्वाचं आहे, केसरकर यांचं वक्तव्य दखल घेण्यासारखं नाही.

https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/5224314667604382/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C-GK2C

दरम्यान, राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र लढायला हव्यात. आम्ही एकत्र लढलो तर लोकांना त्यांना हवं तसं मतदान करून निर्णय घेता येईल. पण यासाठी आधी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा केली पाहिजे, तिघे एकत्र बसून याबाबत शक्य झाले तर निर्णय घेऊ असे म्हणत शरद पवारांनी आगामी निवडणुकांतही महाविकास आघाडीचे संकेत दिले आहे.

केसरकर नेमकं काय म्हणाले होते-

जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता. छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यामागे पवारांचे आशीर्वाद होते. असा आरोप दीपक केसरकर यांनी केला. यानंतर मात्र त्यांनी सारवासारव केली. शरद पवार महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत. ते मला गुरुसमान आहेत, मी त्यांच्याबद्दल एकही चुकीचा शब्द बोललो नाही, लोकांना माझ्याविरुद्ध भडकवलं जात आहे. असं केसरकर म्हणाले.

Leave a Comment