शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही काही महिन्यांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं होत. मात्र पुन्हा एकदा शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते पुणे मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी या मतदार संघात विजय प्राप्त केला होता. मात्र कॉमनवेल्थ खेळात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. विश्वजित कदम हे आता कडेगाव-पलूसचे आमदार आहेत. त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पवारांसाठी पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मागितल्याची माहिती पुढे आली आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भाजपा सोडून इतर सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार हे नेतृत्व करू शकतात. अशा वेळी राज्यसभेऐवजी लोकसभेची निवडणूक लढणे पवारांसाठी गरजेचं असणार आहे. त्यामुळे ही रणनिती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment