शरद पवारांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

साताऱ्यात पुण्यतिथी कार्यक्रमास विविध नेत्याची उपस्थिती

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्त त्याच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा दौऱ्यात विशेष दक्षता घेतली जात आहे. आज सकाळी 9 वाजता शरद पवार यांनी विविध नेत्यांसह कर्मवीर याच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 63 व्या पुण्यतिथी निमित्त विविध मान्यवरांकडून अभिवादन केले जात आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी शरद पवार यांचे रविवारी, दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी आज समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतली. यानंतर त्यांनी संस्थेतील संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थितीही लावली.

दरम्यान, आज सातारा येथील जकातवाडीतील शारदाश्रममध्ये भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेची 39 वी वार्षिक सभा होणार आहे. फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार व युवा साहित्य पुरस्काराचे शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते वितरण केले जाणार आहे.