हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (IBPS & MPSC Exam) या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुण्यात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसाद सुद्धा आता पाहायला मिळत आहेत. कारण विद्यार्थ्यांसाठी खुद्द जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)आता मैदानात उतरणार आहे. शरद पवारांनी याबाबत ट्विट करत थेट राज्य सरकारला इशारा दिला आहे.
काय आहे शरद पवारांचे ट्विट?
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे शरद पवार आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठीही मैदानात दिसतील . तसेच सरकार आता यावर काय उपाय काढत ते सुद्धा पाहायला मिळेल.
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 21, 2024
आज दुपारी बैठक-
दरम्यान, आज दुपारी एक बैठक घेऊन यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.