शरद पवार आज पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे घेणार दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवरील कारवाई आणि भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे राज्यातही राजकारण चांगलेच तापले आहे. अशात दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी तीन वाजता पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे ही उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकवेळा राज ठाकरे यांनी आरोप केले होते. संपूर्ण महाराष्ट्र्भर फिरणारे शरद पवार हे नास्तिक आहेत. ते देव मानतच नाहीत तसेच त्यांचा एकही फोटो देवळात हात जोडतानाचा सापडणार नाही, असे गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केले होते.

राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘मी नास्तिक नाही, मात्र ही माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही, असे पवार यांनी म्हंटले होते. आता त्यानांतर आज दुपारी शरद पवार हे पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत.

Leave a Comment