हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. भाजपप्रणित NDA ला 291 जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला 234 जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडी सुद्धा सत्तास्थापनेचा दावा करणार असून यासाठी बिहारच्या नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू यांची गरज लागणार आहे. मात्र त्यांची मने वळवण्यासाठी इंडिया आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अशावेळी शरद पवार (Sharad Pawar) किंगमेकरच्या भूमिकेत पाहायला मिळू शकतात. नितीशकुमार (Nitish Kumar) आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना इंडिया आघाडीत आणण्यात शरद पवार महत्वाची भूमिका बजावू शकतात.
शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सर्वात वरिष्ठ नेते आहेत. ५० हुन अधिक वर्ष देशाचे राजकारण जवळून बघितल्याने आणि अनुभवल्याने देशातील सर्वच राज्यातील दिग्गज नेत्यांचा पवारांशी थेट संपर्क आहे. एका फोनवरून शरद पवार देशातील सूत्रे हलवू शकतात हा इतिहास सर्वानाच माहित आहे. शरद पवार कधीही काहीही करू शकतात या भितीपोटी भाजपही पवारांना दचकून असते. म्हणूनच तर आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बोटाने मोजण्याएवढे असले तरी शरद पवारांचं महत्व दिल्लीच्या राजकरणात नेहमी मोठं राहील आहे. आताही इंडिया आघाडीला नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची गरज असून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे काम शरद पवार करू शकतात. आत्तापर्यंत या दोन्ही नेत्यांसोबत पवारांनी केलेलं काम, समविचारी पक्ष, आणि मूळचा मोदीविरोधी हि कारणे पटवून देऊन शरद पवार हे नितीशकुमार आणि चंद्राबाबूं नायडू याना इंडिया आघाडीकडे खेचू शकतात.
महाराष्ट्रात २०१९ साली उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन शरद पवारांनी महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला होता, आणि भाजपला संख्याबळ जास्त असूनही सत्तेपासून दूर ठेवलं होते. तोच प्रयोग आता देशपातळीवर करण्याची ताकद शरद पवार यांच्यात अजूनही आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवार किंगमेकर ठरतील असं बोललं जातंय.
दरम्यान, नितिंशकुमार यांच्या JDU चे १२ आणि चंद्राबाबू नायडू यांच्या TDP चे १६ खासदार आहेत. सध्या इंडिया आघाडीकडे २३४ खासदारांचे बळ आहे. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यानंतर हाच आकडा २६२ वर जातोय… यानंतर काही अपक्षांच्या मदतीने इंडिया आघाडी २७२ पर्यंत जाऊन सरकार स्थापन करू शकते. नितीश कुमार यांचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता ते कधीही पलटी मारु शकतात. त्यामुळे आताही राजकीय परिस्थिती पाहून नितीशकुमार पुनः एकदा इंडिया आघाडीसोबत जाणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.