पर्रीकरांवर पवारांनी केलेल्या विधानाचे मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राफेल करारात संरक्षण मंत्री म्हणून मिळत नसलेला सहभाग पाहून मनोहर पर्रीकरांनी संरक्षण मंत्री पदाचा  राजीनामा दिला असे  विधान शरद पावर यांनी मागे प्रचार सभेत केले होते. त्या विधानाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

मनोहर पर्रीकरांच्या निधाना नंतर शरद पवार यांच्या सारख्या नेत्याने त्याच्यावर विधान करणे योग्य नाही. मनोहर पर्रीकरांनी निधनाआधी आठ दिवस नरेद्र मोदी यांच्यासाठी दोन तरी प्रचार सभा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.  नरेद्र मोदी यांच्या सारखा पंतप्रधान पुन्हा होणे नाही. म्हणून आपण नरेद्र मोदी यांच्या प्रचारासाठी दोन तरी प्रचार सभा घेवू इच्छतो असे पर्रीकर म्हणाले होते. याबद्दल मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी माध्यमांना अवगत करून दिले आहे.

कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी राफेल करारावरून भाजप सरकारवर निशाणा साधला होता. राफेल करार योग्य पद्धतीने केला जात नव्हता. तसेच विमानाच्या किंमती तिन वेळा बदलल्या होत्या. या  सर्व बाबी नपटल्याने पर्रीकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडण केले आहे.

Leave a Comment