मुंबई । आज म्हणजेच 1 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी होती. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स (Sensex) 831.53 अंकांच्या म्हणजेच 1.40 टक्क्यांच्या मोठ्या उसळीसह 60,138.46 वर बंद झाला. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी देखील आज 258.00 अंकांनी किंवा 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 17,929.70 च्या पातळीवर बंद झाला. आज बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्ससह सर्व क्षेत्रांनी तेजी नोंदवली.
निफ्टी बँक 39 हजारांच्या पुढे बंद
निफ्टी आयटी, बँक आणि ऑटोसह सर्व क्षेत्रांनी आज वाढ नोंदवली. निफ्टी बँक 648.20 अंकांच्या वाढीसह 39,763.80 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी आयटी 881.15 अंकांनी वाढून 35289.90 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टी ऑटोने 1.09 टक्के किंवा 123.55 अंकांची वाढ नोंदवली आणि तो 11421.00 च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी BSE स्मॉलकॅपमध्येही आज तेजी दिसून आली. तो 1.11 टक्क्यांनी किंवा 310.25 अंकांनी 28,293.05 वर बंद झाला तर BSE मिडकॅप 1.75 टक्क्यांनी वाढून 25,720.18 वर बंद झाला.
या शेअर्सच्या जोरावर बाजार तेजीत होता
BSE Sensex मध्ये आज इंडसइंड बँकेचा शेअर टॉप गेनर ठरला. कंपनीच्या शेअर्सने 7.80 टक्क्यांची जबरदस्त उडी नोंदवली. याशिवाय हिंदाल्कोचा शेअर्स 3.97 टक्के, एचसीएल टेकचा शेअर्स 3.96 टक्के, भारती एअरटेलचा शेअर्स 3.96 टक्के आणि ग्रासिमचा शेअर्स 3.95 टक्क्यांनी वधारला.