हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातील पहिल्या 10 मधील पाच कंपन्यांची मार्केटकॅप 30,737.51 कोटी रुपयांनी घसरली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सर्वात मोठा तोटा झाला. हे लक्षात घ्या कि, गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 183.37 अंकांनी किंवा 0.30 टक्क्यांनी वाढला. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची मार्केटकॅप 12,883.7 कोटी रुपयांनी घसरून 17,68,144.77 कोटी रुपये झाली.

या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स यांच्या मार्केटकॅपमध्येही घसरण झाली. तर दुसरीकडे, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि एलआयसी गेनर्स ठरले. Share Market
टीसीएसची मार्केट कॅप घटली
स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅप 9,147.73 कोटी रुपयांनी घसरून 4,64,436.79 कोटी रुपयांवर आली. तर TCS) ची मार्केट कॅप 5,323.92 कोटी रुपयांनी घसरून 12,38,680.37 कोटी रुपये झाली. तसेच ICICI बँकेची मार्केट कॅप 2,922.03 कोटी रुपयांनी घसरून 6,05,807.09 कोटी रुपये झाली. Share Market

एचडीएफसी बँकेची मार्केट कॅप वाढली
बजाज फायनान्सची मार्केट कॅप 460.13 कोटी रुपयांनी घसरून 4,42,035.99 कोटी रुपये झाली. तर दुसरीकडे, हिंदुस्तान युनिलिव्हरची मार्केट कॅप 9,128.17 कोटी रुपयांनी वाढून 6,18,894.09 कोटी रुपये झाली. HDFC बँकेने 4,835.37 कोटी रुपयांची वाढ नोंदवली. यावेळी तिची मार्केट कॅप 8,30,042.72 कोटी रुपये झाली आहे.
LIC ची मार्केट कॅप देखील 2,308.62 कोटी रुपयांनी वाढून 4,33,768.34 कोटी रुपये तर HDFC ची मार्केट कॅप 1,916.08 कोटी रुपयांनी वाढून 4,47,675.98 कोटी रुपये झाली. Share Market
![]()
गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने पुन्हा गाठला 60 हजारचा टप्पा
गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 183.37 अंकांच्या (0.30 टक्के) वाढीसह 59,646.15 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 50 देखील 60.50 अंकांच्या (0.34 टक्के) वाढीसह 17,758.5 वर बंद झाला. यावेळी सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा ओलांडला तर निफ्टी सुद्धा 18,000 च्या जवळ पोहोचला. गेल्या आठवड्यात बीएसई मिड-कॅप मध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली. Share Market

परदेशी गुंतवणूकदारांचा परतले
NSDL च्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी 1 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान भारतीय बाजारातून 44,481 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. हे लक्षात घ्या कि, परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारपेठेत एकाच महिन्यात झालेली ही सर्वात मोठी खरेदी आहे. या काळात विदेशी गुंतवणूकदारांकडून डेट मार्केटमध्येही गुंतवणूक करण्यात आली आहे, मात्र ती शेअर्सच्या तुलनेत खूपच कमी आहे. Share Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nse.com
हे पण वाचा :
Stock Market : येत्या आठवडय़ात ‘हे’ घटक ठरवतील शेअर बाजाराची दिशा !!!
Aadhar Card मध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या !!!
Multibagger Stock : गेल्या वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 63,000% रिटर्न !!!
Stock Market : ‘या’ 4 कारणांमुळे शेअर बाजाराच्या वाढीला लागला ब्रेक !!!
कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग येत्या अडीच वर्षात भरुन काढणार : डॉ. अतुल भोसले




