हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. आजपासून डिसेंबर महिना सुरु झाला असून , 2024 वर्ष संपायला फक्त एक महिला राहिला आहे. हा महिना गुतंवणूकदारांसाठी आर्थिक बाजूच्या तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकिनातून अतिशय महत्वाचा मनाला जातो. पण या महिन्यात गुंतवणूकदारांना बाजारात कमी व्यवहार करावे लागणार आहेत. कारण डिसेंबर महिन्यात तब्बल 10 दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. तर चला जाणून घेऊयात कोणकोणत्या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे.
डिसेंबरमधील सुट्ट्या
शेअर मार्केटला डिसेंबरमध्ये शनिवार , रविवार आणि रेड मार्क धरून एकूण दहा सुट्या आहेत . या महिन्याच्या प्रत्येक शनिवारी म्हणजे 7 ,14 ,21 आणि 28 रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. त्याचबरोबर आठवड्याच्या सुट्टीमध्ये 1 ,8 ,15 , 22 तसेच 29 रोजी रविवार असल्यामुळे शेअर मार्केटचे व्यवहार बंद असतील . या सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त 25 डिसेंबरला बुधवारी ख्रिसमस , नाताळ निमित्त सुट्टी असणार आहे.
दहा दिवस शेअर मार्केट बंद
डिसेंबर महिन्यात चार शनिवार आले आहेत . तसेच पाच रविवार आणि नाताळची सुट्टी मिळवून तब्बल दहा दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. या महिन्यात एकूण 31 दिवस असून , यामध्ये व्यवहाराचे गणित पाहिल्यास 31 मधून 10 सुट्ट्या वजा केल्यास 21 दिवस शिल्लक राहतात. या शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये शेअर मार्केटच्या गुंतवणूकदारांना व्यवहार करता येणार आहेत.
2024 मध्ये 17 दिवस सुट्ट्या
2024 या वर्षात बीएसई आणि एनएसईने वर्षाच्या 14 दिवस सुट्ट्या जाहीर केल्या होत्या , या 14 दिवसाच्या सुट्ट्यामध्ये शनिवार आणि रविवार पकडले जात नाहीत. पण अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीला , लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे 20 नोव्हेंबर या सुट्ट्यांच्या दिवसांची भर पडली आहे . त्यामुळे एकूण 17 सुट्ट्या या वर्षी शेअर बाजाराला देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले. सेन्सेक्सने एका दिवशी 1000 अंकांची उसळी घेतली, तर दुसऱ्या दिवशी तो 1000 अंकांनी घसरला. मात्र आता बाजारात चांगली वाढ दर्शवली जात आहे.