Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यावेळी मध्यमवर्गीयांना दिलासा देताना नवीन सिस्टीम अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स आकारला जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. विमा कंपन्यांसाठी मात्र यंदाचा अर्थसंकल्प चांगला ठरलेला नाही. नवीन टॅक्स सिस्टीम आकर्षक बनवण्याच्या प्रयत्न आणि विमा पॉलिसी प्रीमियमवर कर सवलत देण्याबाबतच्या अर्थसंकल्पीय घोषणांनंतर LIC सहीत सर्वच मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. Share Market

Sensex Crash Today Reasons: Stock Market Crash Today: शेयर बाजार में  कोहराम, सेंसेक्स 675 अंक लुढ़का, निफ्टी 18000 के नीचे आया - stock market  crash today reason sensex tumbles675 points nifty comes

विमा क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की, नवीन टॅक्स सिस्टीमला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे विमा कंपन्यांच्या व्यवसायाला धक्का बसला आहे. कारण अनेक करदाते हे फक्त कलम 80C अंतर्गत सूट मिळवण्यासाठीच विमा पॉलिसी खरेदी करतात. जर नवीन टॅक्स सिस्टीम जास्त फायदेशीर असेल तर करदाते ते निवडतील ज्यामुळे विमा पॉलिसींच्या विक्रीवर परिणाम होईल. Share Market

Share Market में लौट आई बहार.. Zomato, TCS और SBI पर इन्वेस्टर्स का फोकस -  Share Market today bse sensex nse nifty rally continues after fed interest  rate hike tuts - AajTak

कर सवलतीबाबत कठोर नियम

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी उच्च मूल्याच्या विमा पॉलिसींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्समध्ये मिळणारी सूट मर्यादित केली आहे. या अर्थसंकल्पात असेही म्हटले गेले की,” 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (ULIPs वगळता) ज्यांचा एकूण प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा पॉलिसींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच सूट दिली जाईल. तसेच 5 लाखांपेक्षा कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसींवर सवलत मिळणार नाही. याचा अर्थ विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या रकमेवरील टॅक्स सवलतीवर परिणाम होणार नाही, असे बजटमध्ये सांगण्यात आले होते. यासोबतच 31 मार्च 2023 पूर्वी जारी केलेल्या विमा पॉलिसींवर कोणताही परिणाम होणार नाही, म्हणजेच त्यांना कर सवलतीचा लाभ मिळतच राहील. Share Market

Nifty, Sensex drop two per cent as bears take control of D-Street—Key  factors behind today's market fall | Zee Business

शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण

हे लक्षात घ्या कि, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लगेचच विमा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होऊ लागली. यावेळी LIC च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. NSE वर दुपारी 3.30 वाजता LIC चे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरून 601 रुपयांवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरून 1,097.95 रुपयांवर, ICICI प्रुडेन्शियल लाइफ 9.88 टक्क्यांनी घसरून 407.50 रुपयांवर आणि HDFS लाइफ इन्शुरन्स 11 टक्क्यांनी घसरून 515 रुपयांवर तर जनरल इन्शुरन्सचे शेअर्स इंट्राडेमध्ये 14 टक्क्यांनी घसरून 158 रुपयांवर आले आहेत. Share Market

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=LICI

हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Union Budget 2023 : करदात्यांना खुशखबर!! मोदी सरकारकडून नवी कररचना जाहीर
Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग?? पहा एका Click वर
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा
Union Budget 2023 : पर्यटनसाठी खास तरतूद; स्वदेश दर्शन योजनेसह युनिटी मॉल बद्दल अर्थमंत्र्यांचे मोठे निर्णय