आ. शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का ; कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

सातारा | सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल हाती येत असून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना कोरेगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या 5 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.

कोरेगाव तालुक्यातील मंगळापूर,किन्हई पेठ, कटापूर,ल्हासुर्णे आणि देऊर या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. गतवर्षी शशिकांत शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. आणि आता या 5 ग्रामपंचायती हातातुन गेल्याने शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदेंप्रमाणेच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही कराड तालुक्यात भाजपने धोबीपछाड दिला आहे. शेरे, शेणोली कार्वे यांसारखी मोठी गावे काँग्रेसने गमावली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like