.. मग पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं काय चालतं ? सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भाजपला विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आता समोर आले आहेत. मुनगंटीवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष करत विरोधकांना प्रतिसवाल केला आहे. जाणता राजा ही जर छत्रपती शिवाजी महाराज याना दिली जात असेल तर शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं तुम्हाला कसं काय चालतं ? अशी विचारणा करत विरोधांकाना प्रतिउत्तर दिलं. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. एका वृत्तवाहिनीवर त्यांनी ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली.

जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना होऊ शकत नाही असंही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितलं. जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. तसच इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असं म्हटलं गेलं आहे. तेही तुम्हाला मान्य आहे,” अशी आठवण त्यांनी विरोधकांना करुन दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत, असा आरोप मुनगुंटीवार यांनी केला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी केली होती. पण त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्या पुस्तकावरील वाद मिटला होता, असं सांगत मुनगंटीवार यांनी काहीसा बचावाचा पवित्रा घेत स्पष्टीकरणं दिलं आहे. मात्र हा वाद अजून इतक्यात तरी शमेल असं वाटत नाही आहे. तर तिकडे या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी पक्षाने आदेश दिल्यास पुस्तक मागे घेऊ असं सांगितलं आहे.

Leave a Comment