चक्क दोरउड्या मारून लाखो रुपये कमावले!!! महिलेचा ‘हा’ व्हिडिओ पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोरउड्या मारणे हा शरीरासाठी एक अतिशय चांगला व्यायाम मानला जातो. दोरउड्या मुळे आपलं आरोग्य चांगले राहते. मात्र दोरउड्या मारून कोणी लाखो रुपयांची कमाई केल्याचं आपण कधी ऐकलं आहे का?? हो हे खरं आहे. द सन च्या अहवालानुसार, 30 वर्षीय लॉरेन जंप्स नावाची महिला दोरउड्या मारून लाखो रुपये कमावते येवडच नव्हे तर सोशल मीडियावर ती इतकी प्रसिद्ध झाली आहे की आता अनेक मोठे ब्रॅण्डही तिच्यासोबत काम करत आहेत.

एका सेल्स कंपनीत काम कराणाऱ्या लॉरेनला 2020 मधील पहिल्या लॉकडाऊन दरम्यान अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यादरम्यान ती घरीच जिमही करत असे. लॉक डाऊन दरम्यान ती घरीच दोर उड्या मारू लागली. सतत दोरउड्या मारत मारत ती त्यात इतकी एक्सपर्ट झाली की तिने वेगवेगळ्या प्रकारे दोरीवर उड्या मारायला सुरुवात केली.

यानंतर तिने सोशल मीडियावर स्वतःचे एक वेगळे अकाउंट काढले ज्यामध्ये तिने दोरीच्या उड्या मारण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. यानंतर अवघ्या काही दिवसांतचा तिचे व्हिडिओ खूप लोकप्रिय झाले आणि अनेक ब्रँड्स आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी तिच्याशी कॉन्टॅक्ट करू लागले. डायट ब्रँड्स, एडिडास सारख्या स्पोर्ट्सवेअर ब्रँडने तिच्याशी टाय-अप केले आहेत आणि लॉरेन सामान विकून पैसे कमवते.

तिने सांगितले की, याआधी ती 9 ते 5 वाजेपर्यंत जॉब करायची मात्र आता ती दिवसातून 6-6 तास दोरीच्या उड्या मारते आणि व्हिडिओ बनवते. या कामामुळे आता तिला आर्थिक कमाई जास्त होत असून ती आपल्या कमावलेल्या पैशांची चांगल्या प्रकारे गुंतवणूक करत आहे