Sunday, May 28, 2023

ती चक्क 4 तरुणांच्या सोबत गाव सोडून पळाली; गावाने चिठ्ठ्या टाकून लावून दिले एकाशी लग्न

उत्तर प्रदेश | प्रेम हे अंध असते असे म्हटले जाते, पण कधीकधी प्रेम हे अंध सोबत गोंधळलेलेही असते. असे दिसून येते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमध्ये एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आले आहे. अनोख्या प्रेमप्रकरणामुळे याची सर्वत्र चर्चा केली जात आहे. येथील एक मुलगी चार मुलासोबत पळून गेली होती. यानंतर गावाने चौघांपैकी एकाशी तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. आणि शेवटी ही अनोखी घटना घडली.

चार दिवसापूर्वी एक मुलगी कोतवाली तांडा परिसरातून चार मुलांसोबत घरातून पळून गेली होती. गाववाल्यांनी तरुणांना पकडले. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी देखील सुरू केली होती. पण पंचांनी चौघांपैकी एकाशी लग्न करण्याचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. पण, चौघांपैकी कोणाशी लग्न करावे याबाबत तिच्या मनात गोंधळ होता. शेवटी चौघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. आणि एक चिट्ठी काढल्यानंतर ज्याचे नाव आले त्याच्यासोबत त्या मुलीचे लग्न लावण्यात आले.

अजीम नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. मुलगी चौघांपैकी कोनाला वर म्हणून निवडावे यामुळे गोंधळून गेल्यामुळे पंचांनी नवरदेवाची निवड करण्याचे ठरवले. चौघा मुलांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातील एका मुलाला एक चिठ्ठी उचलायला लावली. आणि ज्याचे नाव त्या चिठ्ठीत निघाले त्या मुळाशी तिचे लग्न लाऊन देण्यात आले. अशी अनोखी घटना घडल्यामुळे सर्वत्र याची चर्चा होत असताना पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.