हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिग बॉस 13 हा एक मोठा धमाका होता. पण आता बिग बॉस ऐवजी कलर्स चॅनेलवर ‘मुझसे शादी करोगे’ हा नवीन रिऍलिटी शो सुरू झाला आहे, ज्यामध्ये पारस छाबरा आणि शहनाज गिल जे ‘बिग बॉस १३ ‘ चे स्पर्धक होते ते स्वत: साठी जोडीदार शोधणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात जोरदार झाली आहे. पहिल्याच दिवशी या कार्यक्रमात खूप मोठा गाजावाजा झाला. परंतु, ‘मुझसे शादी करोगे’मध्ये खळबळ तेव्हा माजली, जेव्हा शहनाज गिल हिने डोळ्यांवर पट्टी बांधलेली असूनही सिद्धार्थ शुक्ला याला केवळ तीच्या हातांनी स्पर्श करून ओळखले.
शहनाज गिलच्या स्वंयवरचा हा व्हिडिओ बिग बॉसच्या फॅन पेजने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की शहनाज गिल सिद्धार्थला पाहून खूपच उत्तेजित झाली. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी बरीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत.
बिग बॉस १३ दरम्यान सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची मैत्री खूप चर्चेत होती. दोघे कधी कधी भांडत असत तर कधी एकत्र वेळ घालवत असत. बिग बॉस १३ मध्ये सिद्धार्थ शुक्लाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व गाजवले आणि संपूर्ण कार्यक्रमही त्याच्या आजूबाजूला होता. या वेळेच्या बिग बॉस १३ चा विजेता हा सिद्धार्थ शुक्ला बनला आहे.




