इतका ऍटिट्यूड? शहनाज गिलचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा झाला संताप; पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १३ फेम शहनाज गिल कधीकाळी फक्त आणि फक्त एक पंजाबी सिंगर होती. मात्र यानंतर आता तिच्याकडे कामाची काहीही कमी नाही. सध्या तिच्याकडे अगदी म्युझिक व्हिडीओपासून जाहिरातींपासून अन्य अनेक विविध प्रोजेक्ट आहेत. इतकंच काय तर तिचं फॅन फॉलोईंग पण अगदीच जबरदस्त आहे आणि तरीही यावेळी ती सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. याच मुख्य कारण म्हणजे तिचा हा वायरल व्हिडीओ. या व्हिडिओत तिच्या पायातले हिल्स काढण्यासाठी स्टाफ मेंबर झुकला आणि शहनाझ याचमुळे ट्रोल झाली. हा व्हिडीओ मुंबईतील एका शूटींग दरम्यानचा आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात शहनाज तिच्या स्टाफसोबत सेटबाहेर व्हॅनिटीकडे जाताना दिसत आहे. दरम्यान तिने हिल्स घातल्या आहेत. पण कदाचित यामुळे तिला चालण्यास त्रास होतोय आणि अशातच एक स्टाफ मेंबर येतो आणि खाली वाकून तीच्या पायातील हिल्स काढतो. यानंतर शहनाज चप्पल घालून जाते. शहनाजने एखाद्या व्यक्तीकडून सॅण्डल काढून घ्यावी हे नेटकऱ्यांना पटण्यासारखं नसल्यामुळे ती चांगलीच ट्रोल होतेय.

तुला स्वत:ची सॅण्डल स्वत: काढताना लाज वाटते का? असा सवाल एका युजरने तिला केला आहे. तर, इतकी चरबी आलीये का? अशा शब्दांत अन्य युजरने संताप व्यक्त केला आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती शहनाज, तुला लाज वाटायला हवी, असेही एका नाराज युजरने लिहिले आहे. यावर तिच्या अनेक फॅन्सने या ट्रोलर्सला उलट उत्तरे करत तिची बाजू घेतली आहे. मात्र असं काय आणि तास काय हे प्रयत्न असफलच दिसत आहेत. ‘बिग बॉस 1३’ने शहनाज गिल विचार केलेल्यापेक्षा जास्त लोकप्रिय झाली. इतकेच काय तर ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. यामुळे काही दिवसांतच शहनाजची फॅन फॉलोईंग वाढली होती. बिग बॉसनंतर ‘शहनाज गिल की शादी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती दिसली होती. मात्र हा शो प्रेक्षकांना काही आवडला नव्हता.

You might also like